छोटा राजनविरुद्ध 71 खटले दाखल ; पण 46 केेसेस बंद करण्याचा पोलिसांचा अहवाल

साक्षीदार सापडेना त्यामुळे आली ही वेळ
Chota Rajan
Chota Rajan
Published on
Updated on

मुंबई : गुंड छोटा राजनविरोधात (Chota Rajan) सीबीआयने दाखल केलेल्या ७१ प्रकरणांपैकी सुमारे ४६ प्रकरणांत सीबीआयने ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे; तर दुहेरी हत्याकांडाचे दोन खटले अंतिम टप्प्यात आहेत. (Mumbai Police files closuer reports in 46 cases of Gangster Chota Rajan)

राजनला बालीमधून नोव्हेंबर २०१५ मध्ये भारतात आणले होते. त्याच्याविरोधात राज्यात तब्बल ७१ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व फौजदारी फिर्यादी सीबीआयकडे वर्ग करण्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारनेही त्या वेळी सहमती दिली होती. मुंबई पोलिसांनी एकूण ७१ गुन्हे राजनविरोधात दाखल केले आहेत. यापैकी ४६ प्रकरणांत ज्यामध्ये साक्षीदार शोधणे आणि पुरावे गोळा करणे अशी प्रकरणे ‘क्लोजर रिपोर्ट’द्वारे बंद केली आहेत. त्यासाठी विशेष न्यायालयात आणि दंडाधिकारी न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

७१ पैकी अनेक जुने गुन्हे आहेत जे सन १९८३ पासून आहेत. यामध्ये आता साक्षीदार हयात नाहीत. तसेच अनेक साक्षीदार जागा सोडून गेले आहेत किंवा पोलिसांना अन्य पुरावे दाखल करणे शक्य नाही. त्याशिवाय यामध्ये आवश्यक असलेला कॉल डाटा मिळणेही शक्य नाही. त्यामुळे अशी प्रकरणे बंद केली आहेत, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. यामध्ये खंडणीचे गुन्हे अधिक आहेत, असे ते म्हणाले. याचबरोबर अनेक प्रकरणांत मूळ तक्रारदाराचा मृत्यू झाला आहे किंवा त्याचा पत्ता बदलला आहे. त्यामुळेही काही प्रकरणे बंद केली आहेत, असे त्यांनी सांगितले. गँगवॉर, खंडणी न दिल्यामुळे धमकी, हत्या अशी प्रकरणे आहेत.

सध्या राजनविरोधात अभियोग पक्षाने चार-पाच खटल्यांमध्ये दोषित्व सिद्ध केले आहे. दुहेरी हत्याकांडाच्या तीन खटल्यांचे काम सध्या सुरू असून, दोन खटले अंतिम टप्प्यात आहेत, असे त्यांनी सांगितले. राजनने त्याच्यावरील सर्व प्रकरणांची सुनावणी एकाच न्यायालयात करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. यावर अद्याप उच्च न्यायालयातील सुनावणी प्रलंबित असून, नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com